नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ शाळा सुरु करण्याबाबत घेतला निर्णय
अहमदनगर| Ahmedagar Reopen School: करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळा सध्या तरी बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. प्रशासनाने ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली आहे
अहमदनगर जिल्ह्यात आज करोनाचा विस्फोट झाला. त्यामुळे जिल्ह्यातील कोणत्याच माध्यमाच्या शाळा, महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने निर्णय घेतलेला नाही. वाढत्या करोना संसर्गामुळे जिल्हा प्रशासनाने ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली आहे. करोना संसर्ग कमी झाल्यानंतर आठवडाभरात निर्णय घेण्याच्या सूचनाही पालकमंत्री मुश्रीफ यांनी दिल्या. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनीही प्रशासन करोना संसर्ग कमी होताच शाळा, महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात कार्यवाही करेल, असे सांगण्यात आले आहे.
Web Title: Ahmedagar Reopen School decision Hasan Mushrif