Home अहमदनगर अहमदनगर: पतीच्या निधनानंतर काही तासातच पत्नीने सोडला प्राण

अहमदनगर: पतीच्या निधनानंतर काही तासातच पत्नीने सोडला प्राण

Ahmednagar Within hours of her husband's death, his wife died

Ahmednagar News Live | अहमदनगर: नगर तालुक्यातील बहिरवाडी येथे हृदयद्रावक घटना घडली आहे. पतीचे निधन झाल्यानंतर पतीचा विरह सहन न झाल्याने अवघ्या काही तासातच पत्नीनेही प्राण सोडले.

याबाबत अधिक माहिती अशी की, नगर तालुका भाजपचे उपाध्यक्ष राजू दारकुंडे यांचे वडील पाराजी शंकर दारकुंडे (वय ७८) यांचे सोमवारी (दि. २४) रोजी सकाळी निधन झाले. त्यांच्यावर दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. आयुष्यभर संसाराचा गाडा चालवताना एकमेकांच्या आणाभाका खात मोठ्या कष्टान संसार फुलविण्यात आला होता. सुमारे साठ वर्षे एकत्रित संसार करणाऱ्या तसेच एकमेकांच्या सुखदुःखात सदैव साथ देणाऱ्या पतीचा विरह सहन न झाल्याने त्यांच्या पत्नी गयाबाई (वय ७३) यांनीही दुपारी आपले प्राण सोडले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Ahmednagar Within hours of her husband’s death, his wife died

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here