धावत्या कारमध्ये हृदयविकाराचा झटका; अकोलेतील चालकाचा सीटवरच मृत्यू
सिन्नर: रस्त्यात त्रास होऊ लागल्याने कार रस्त्याच्या कडेला थांबवून उभी केल्यानंतर चालकाचा सीटवर बसलेल्या अवस्थेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सकाळी दहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
संतोष लहानू पोखरकर (35, रा. धामणगाव आवारी, ता. अकोले Akole) हा युवक कार घेऊन सिन्नर-शिर्डी रस्त्याने वावी वेसकडून संगमनेर नाक्याकडे जात असताना त्याला त्रास होऊ लागल्याने संतोषने त्याची कार वावी वेस भागात एका दुकानासमोर उभी केली. काही वेळाने दुकानदाराने दुकानासमोरील गाडी पुढे घ्या, असे सांगण्यासाठी आल्यानंतर त्याला ड्रायव्हर सीटवर युवक सीटबेल्ट लावलेल्या अवस्थेत झुकलेला दिसून आला.
दुकानदाराने तातडीने घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येवून पाहणी केली असता त्याला तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. रस्त्याने गाडी चालवत असताना हृदयविकाराचा झटका (heart attack in car) येऊन गाडीत त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज प्रथमदर्शनी व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
Web Title: Sinnar Akole Driver heart attack in car