Home अहमदनगर Murder Case: भरदिवसा एकाने दगडाने ठेचून खून

Murder Case: भरदिवसा एकाने दगडाने ठेचून खून

Murder Case day someone stoned him to death

अहमदनगर | Murder Case: भरदिवसा एका मध्यमवयीन व्यक्तीचा दगडाने ठेचून निर्घुण खून केल्याची घटना नगर शहरातील नेप्ती नाका परिसरात बुधवारी उघडकीस आली आहे. एका संशियीतास ताब्यात घेण्यात आले आहे.

दिलीप देवराम विरदकर वय ४५ रा. ठागणेमळा नळेगाव नगर असे या खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

नेप्ती नाका परिसरात रस्त्याच्या बाजूला एका व्यक्तीचा मृतदेह काही नागरिकांना आढळून आला. याबाबत कोतवाली पोलिसांना कळविण्यात आले. त्यानंतर घटनास्थळी पोलीस उप अधीक्षक विशाल ढुमे, कोतवाली पोलीस ठाण्याचे उ[निरीक्षक भंगाळे यांच्या पथकासह जाऊन मृतदेह ताब्यात घेण्यात आला. यानंतर पोलिसांनी व स्थानिक गुन्हे शाखेने एका संशियीतास ताब्यात घेतले आहे. हा खून कोणी व का, कशामुळे केला हे अद्याप समोर आले नाही. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.  या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. 

Web Title: Murder Case day someone stoned him to death

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here