शेजारील दोघा जणांनी एकास मासे पकडण्यासाठी नेले असता त्याच्यासोबत केले असे काही
अहमदनगर | Murder: शहरातील रामवाडी येथील कचरू दत्तू कांबळे वय ४६ यांच्या मृत्यूप्रकरणी दोघांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी मयताचा मुलगा आकाश कांबळे यांनी मंगळवारी रात्री फिर्याद दिली असून यावरून पोलिसांनी योगेश आरुणे व युनिस शेख दोघे रा. रामवाडी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबबत माहिती अशी की, कचरू कांबळे याना मंगळवारी सकाळी त्यांच्या घराजवळ राहणारे योगेश व युनुस यांनी बीड जिल्ह्यातील दौलावडगाव येथे मासे पकडण्यासाठी नेले होते. दरम्यान कचरू कांबळे यांना योगेश व युनुस यानी अज्ञात कारणातून मारहाण केल्याने त्यांचा मृत्यू झाला असे फिर्यादीत म्हंटले आहे. या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून न्यायालयाने १९ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
Web Title: Ahmednagar Murder of person two criminal Arrested