Home अकोले दुर्दैवी, आई पाठोपाठ पत्रकार मुलीचेदेखील निधन, अकोलेकर सुन्न

दुर्दैवी, आई पाठोपाठ पत्रकार मुलीचेदेखील निधन, अकोलेकर सुन्न

Akole mother was followed by the daughter of a journalist

अकोले | Akole: अकोले महाविद्यालयातील सेवा निवृत्त उपप्राचार्य, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. सुनिल शिंदे सर् यांची ज्येष्ठ कन्या व सेवानिवृत्त प्राचार्य सुरेश शिंदे यांची पुतणी सुकृता हिचे बुधवारी पहाटे चिंचवड़ येथे दुःखद निधन झाले. आई पाठोपाठ मुलीचीही करोन विरूद्ध ची झुंज अखेर अपयशी ठरली. सुकृताची आई सुनिताताई शिंदे यांचेही आठ दिवसांपूर्वी दुःखद निधन झाले होते. माय -लेकिंच्या पाठोपाठ झालेल्या निधनामुळे अकोलेकर सुन्न  झाले आहेत. तिच्या  निधनाची बातमी सर्वांना चटका लावून गेली. आईच्या दशक्रिया विधीच्या आदल्याच दिवशी तिने या जगाचा निरोप घेतला. सुकृता हिने पत्रकारीते मध्ये पदविका प्राप्त केली होती. अकोले तालुक्यातील ही पहिली महिला पत्रकार उमलन्या आधीच कोमेजून गेली. पत्रकारिता क्षेत्रासह विविध क्षेत्रातील अनेक जवळच्या लोकांचे करोनामुळे  निधन झाले.  त्यातील एक म्हणजे सुकृता शिंदे. करोनाशी झुंज देत असतांनाच ती आपल्या सर्वांना सोडून गेली.शिंदे सर यांची सुकृता ही ज्येष्ठ कन्या होती तर लहान मुलगी सात्विका ही संगमनेर महाविद्यालय येथे प्राध्यापिका  आहे. मुलींच्या या प्रगतीबद्दल  सर्वांनाच  कौतुक वाटत होते.

सुकृता हिने  संगमनेर महाविद्यालयातील केंद्रातुन वृत्तपत्र पदविका घेतली, तिने मागील वर्षी घवघवीत यश  मिळविले होते. जागतिक महिला दिन असो की महिलांना क़ायदे विषयक जनजागृती पर लेखही तिचे प्रसिद्ध झाले होते .अकोले तालुक्याच्या इतिहासात  पहिली महिला पत्रकार म्हणून ती वाटचाल करू लागली होती.

संगमनेर महाविद्यालयातील वृत्तपत्र पदविका अभ्यासक्रमाचे मार्गदर्शक शिक्षक डॉ संतोष खेडलकर सर् यांचा व माझा फोन झाला. सुकृता ही  गुणी, धाड़सी व हुशार मुलगी होती.त्यांनी सुकृता च्या अभ्यासक्रम कालावधी व परिसर भेटी च्या अनेक आठवणींना उजाळा दिला.  सुकृता ही सर्वांनाच चटका लावून  गेली आहे.

आई सुनिताताई यांच्या निधनाच्या आधीच संगमनेरहुन चिंचवड़ येथे तिला यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले. तिची माउशी तेथे असल्यामुळे  तिला चांगले उपचार मिळून ती लवकर बरी होईल अशी आम्हा सर्वांना आशा होती.

सुकृता हिचे लग्न जमले होते. मध्यंतरी साखर पुडा झाला होता, तिचे नियोजीत पती व त्यांचे कुटुंब तिची काळजी घेत होते. रात्री तिची प्रकृती खालावली. तिच्यावर उपचार करणारे डॉक्टर तिला वाचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते पण तिला वाचविण्यात यश आले नाही.  4 मे 2021 या दिवशी तिचा विवाह निश्चित केला होता. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावा मुळे शासनाला लॉक डाउन पुकारावा लागला होता. त्यामुळे हा विवाह पुढे ढकलन्यात आला होता. अकोले येथील श्रीमंत मंगल कार्यालयही त्यासाठी बुक केले होते. तिच्या हातावर  मेहंदी लागन्याआधीच सर्वांना सोडून गेल्याने मनाला चटका लावून गेली आहे. 

Web Title: Akole mother was followed by the daughter of a journalist

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here