Home पुणे भीमा नदीत आढळला पाच तुकडे केलेला अन् शीर नसलेला मृतदेह, खळबळजनक

भीमा नदीत आढळला पाच तुकडे केलेला अन् शीर नसलेला मृतदेह, खळबळजनक

भीमा नदी पात्रात 30 वर्षीय युवकाचा धारदार शस्त्राने अतिशय क्रूरपणे खून (Murder) करुन त्याचे पाच तुकडे करत शीरविरहित मृतदेह प्लॅस्टिक पिशवीत आढळून आल्याने एकच खळबळ.

Murder Case dead body found in Bhima river, cut into five pieces and headless

इंदापूर: इंदापूर तालुक्यातील तक्रारवाडी येथे भीमा नदी पात्रात 30 वर्षीय युवकाचा धारदार शस्त्राने अतिशय क्रूरपणे खून करुन त्याचे पाच तुकडे करत शीरविरहित मृतदेह प्लॅस्टिक पिशवीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना समजताच भिगवण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा (Crime) दाखल केला आहे.

इंदापूर तालुक्यातील तक्रारवाडी येथे भीमा नदी पात्रात 30 वर्षीय पुरुषाचा मृतदेह आढळल्याने परिसरात पुन्हा खळबळ उडाली आहे मृतदेहाचं शीर धडापासून वेगळं करुन हत्या केली आहे. त्यामुळे मृतदेहाची ओळख पटलेली नाही.

या मृतदेहाची ओळख अद्याप पटली नसून या गूढ आणि तेवढ्याच रहस्यमय क्रूर खुनाचा तपास करण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. पोलीस पथकाने घटनास्थळी भेट देऊन तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. भीमा नदीत मृतदेह सापडण्याचं प्रमाण सातत्याने वाढत आहे. काही दिवसांपूर्वी भीमा नदीत सलग सहा दिवसांत सात मृतदेह आढळले होते. त्यानंतर मोठी घटना समोर आली होती. हे सगळेच मृतदेह एकाच कुटुंबातील आहे, असं पोलीस तपासात पुढे आलं होतं. या घटनेमुळे महाराष्ट्र हादरला होता. मोहन पवार आणि त्यांचे कुटुंबीय 17 जानेवारी रोजी भीमा नदीजवळ आल्यानंतर धनंजय याच्या घरच्यांनी त्यांची वाट अडवली होती. त्यांनी मोहन पवार, त्यांची पत्नी, मुलगी आणि जावयाला बेशुद्ध करुन त्यांच्यासोबत असलेल्या तीन मुलांनासह नदीत फेकलं होतं. पाण्यात बुडून या सात जणांचा मृत्यू झाला होता. दौंड तालुक्यातील पारगाव मधील भीमा नदी पात्रात आढळून आले होते. ही घटना ताजी असताना पुन्हा एकदा शीर नसलेला मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.

Web Title: Murder Case dead body found in Bhima river, cut into five pieces and headless

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here