Home अहमदनगर Murder: जन्मदात्या पित्यानेच केली मुलाची गळा दाबून हत्या

Murder: जन्मदात्या पित्यानेच केली मुलाची गळा दाबून हत्या

Murder Case father strangled the child to death

श्रीरामपूर | Murder Case: जन्मदात्या पित्याने दहा महिन्याच्या मुलाची गळा दाबून हत्या केल्याची घटना घडली असून याप्रकरणी मुलाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून तिच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.

श्रावण बाळनाथ आहीरे वय ४० असे आरोपीचे नाव आहे. नांदगाव जि. नाशिक येथील मूळ रहिवासी आहे. सध्या तो श्रीरामपूर येथील खंडाळा शिवारातील एमआयडीसीजवळ मोकळ्या रानात मेंढ्या घेऊन कुटुंबासोबत राहत होता.

आरोपी याने त्याचा मालक संतोष गोराणे याच्याकडून अडीच लाख रुपये उसने घेतेलेले होते. गोराणे यांचे मेंढ्या सांभाळण्याचे काम तो करत होता. गोराणे यांच्याकडून उसने घेतेलेले पैसे बुडविण्याचा आहिरे याचा उद्देश होता. यातूनच रात्री कुटुंबीय झोपलेले असताना गुरुवारी पहाटे त्याने गळा दाबून हत्या केली. मात्र यास अधिकृत पृष्टी मिळू शकलेली नाही. आरोपीची पत्नी व मुलाची आई सीताबाई हिने पोलिसांना घटनेची माहिती दिली त्यानंतर गुरुवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी पंचनामा करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक समाधान सुरवडे ह्या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहे. आरोपीने मुलाची हत्या का केली यामागील कारणावर तपासा अंती शनिवारी उघड होण्याची शक्यता आहे असे पोलिसांनी सांगितले आहे.

Web Title: Murder Case father strangled the child to death

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here