Home अहमदनगर कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

Crime News Congress city district president charged with molestation 

अहमदनगर | Crime News: कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्याविरोधात तसेच इतर दहा जणांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात विनयभंगप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एमआयडीसीमध्ये एका कंपनीच्या कॉल सेंटरमधील तरुणीने फिर्याद दाखल केली आहे.

गुरुवारी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादीत म्हंटले आहेत की, किरण काळे व त्याच्यासोबत ८ ते १० जणांनी एमआयडीसीतील एका कंपनीच्या कॉल सेंटरमध्ये जबरदस्तीने प्रवेश करत फिर्यादी तरुणीचा हात पकडून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. यावेळी कार्यालातील महिला कर्मचाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. तसेच जाताना मी कॉंग्रेसचा शहर जिल्हाध्यक्ष आहे. हे सगळे धंदे बंद करा. नाही तर तुम्हाला सोडणार नाही. अशी धमकी देण्यात आली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक आठरे हे अधिक तपास करीत आहे. दरम्यान सदर तरुणीने तक्रार दाखल करताच काळे यांनी माध्यमांकडे इमेल करून दिलगिरी व्यक्त केली आहे.

Web Title: Crime News Congress city district president charged with molestation 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here