Home क्राईम संगमनेर तालुक्यात एकास बेदम मारहाण, सात जणांवर गुन्हा दाखल

संगमनेर तालुक्यात एकास बेदम मारहाण, सात जणांवर गुन्हा दाखल

Crime News One beaten in Sangamner taluka

संगमनेर | Crime news: रस्त्यात टाकलेली लाकडे बाजूलाघेणारा संभाजी माधव हासे वय ५२ रा. राजापूर ता. संगमनेर यांस बेदम मारहाण केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

संभाजी हसे हे मंगळापूर शिवारातून गुरुवारी रात्री ९ वाजता आपल्या वाहनातून जात असताना रस्त्यात लाकडे पडलेली होती. हासे हे वाहनातून खाली उतरवून लाकडे बाजूला केली.

यावेळी एकनाथ गणपत धुमाळ व त्यांची पत्नी, अनिल एकनाथ धुमाळ, लता अनिल धुमाळ, सोमनाथ दगडू हासे, शाहु अनिल डावरे, अनिल डावरे यांनी तेथे येत संभाजी हासे यांना शिवीगाळ केली. शाहू अनिल डावरे याने संभाजी हासे यांच्या कपाळावर हातातील कड्याने मारले व त्यांच्या गळ्यातील तीन तोळ्याची सोन्याची चैन हिसकावून घेतली. तर अनिल डावरे याने हासे यांचा हात पिरगळून बोटातील सोन्याची अंगठी काढून घेतली. व त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच जिवे मारण्याची धमकी दिली.

याबाबत संभाजी हासे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्याने पोलिसांनी वरील सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक महाले करीत आहे.

Web Title: Crime News One beaten in Sangamner taluka

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here