Murder: तृतीयपंथीयांकडून प्रवाशाची हत्या, या तालुक्यातील घटना
राहता | Murder: ५ सप्टेंबर रोजी राहता तालुक्यातील एकरुखे येथे मारहाणीची घटना घडली. रस्त्यावर पैसे न दिल्याने झालेल्या वादातून चार तृतीयपंथी व त्यांच्या साथीदारांनी दोघा प्रवाशांच्या घरी जाऊन त्यांच्यावर लाकडी दांडक्याने प्राणघातक हल्ला केल्याने या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी चार तृतीयपंथासह त्यांच्या चार साथीदारांना श्रीरामपूर येथून अटक केली आहे.
या मारहाणीत दिलीप आभाळे रा. एकरुखे ता. राहता यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
फिर्यादी महेश दिलीप आभाळे यांचे वडील दिलीप आभाळे हे त्याचे मित्र निव्रुती उर्फ नंदू चांगदेव क्षीरसागर असे दोघे ५ सप्टेंबर रोजी गणेशनगर येथे पेट्रोल भरण्यासाठी जात होते. यावेळी गणेशनगर फाटा येथे त्यांना काही तृतीयपंथीयांनी अडवून पैशाची मागणी केली. त्यावरून तृतीयपंथी व आभाळे यांच्यात वाद झाला. हाच राग मनात धरून तृतीय पंथी व त्यांचे साथीदार यांनी त्याच दिवशी एकरुखे येथे जाऊन आभाळे व क्षीरसागर यांना लाकडी दांड्याने मारहाण केली. या हल्ल्यात आभाळे हे जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र गुरुवारी त्यांचा मृत्यू झाला.
स्थामिक गुन्हे शाखेने ८ आरोपींना ताब्यात घेतले आहे. यामधील एक आरोपी फरार आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली काळे, उप अधीक्षक संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
Web Title: Murder of a passenger by a third party