Home अहमदनगर शिर्डीत भरवस्तीत तरुणीची हत्या, संशियीत ताब्यात

शिर्डीत भरवस्तीत तरुणीची हत्या, संशियीत ताब्यात

Shirdi News:   17 वर्षीय युवतीचा पेवर ब्लॉक डोक्यात मारत हत्या (Murder) झाल्याची घटना.

murder of a young girl in Shirdi, Suspicious custody

शिर्डी: शिर्डीतील सैंदडी बाबा रोडवर असलेल्या मयुरेश्वर कॉलनी येथील ज्ञानेश्वरी नवनाथ कुलथे या 17 वर्षीय युवतीचा पेवर ब्लॉक डोक्यात मारत हत्या झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी शिर्डीत घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका युवकाला संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे.

शिर्डी येथील ज्ञानेश्वरी कुलथे या युवतीचा मंगळवारी सायंकाळी हत्या झाल्याची माहिती पोलिसांना समजताच पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर घटनेची माहिती घेतली. या तरुणीच्या डोक्यात पेवर ब्लॉक मारून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांना समजताच युवतीची हत्या कशामुळे झाली असावी याचा तपास पोलिसांनी वेगाने करून याप्रकरणी एका युवकाला पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे.

सदर युवतीच्या आजोबांचे कलिकानगर येथील बाजारतळ परिसरात किराणा मालाचे दुकान असून नातीच्या खुनाची माहिती मिळताच ज्ञानेश्वरीची आई आजोबा आणि नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला. भरवस्तीत 17 वर्षीय तरुणीची हत्या झाल्याने परिसरात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. परंतु ही हत्या कोणत्या कारणाने केली याचा तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: murder of a young girl in Shirdi, Suspicious custody

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here