Home संगमनेर संगमनेर: नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर भिषण अपघातात तरुणाचा मृत्यू

संगमनेर: नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर भिषण अपघातात तरुणाचा मृत्यू

Sangamner News:  नाशिक – पुणे राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भिषण अपघातात तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना.

young man died in a horrific accident on the Nashik-Pune National Highway

संगमनेर: समोरुन भरधाव वेगाने येणार्‍या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथिल रहिवासी असलेला आदित्य सोमनाथ उंबरकर (वय 24) याचा सोमवारी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास नाशिक – पुणे राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भिषण अपघातात तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

आदित्य सोमनाथ उंबरकर हा उच्च शिक्षित तरुण होता. तो घोटी येथिल रुग्णालयात कार्यरत होता. नाशिक – पुणे राष्ट्रीय महामार्गावरून सोमवारी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास आदित्य घोटीच्या दिशेने चालला होता. यावेळी सिन्नर तालुक्यातील बेल्हू फाट्याजवळ समोरुन भरधाव वेगाने येणार्‍या अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या आदित्यला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मात्र अपघात इतका भिषण होता की, उपचारापूर्वीच या तरुणाचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे. आदित्यच्या पश्चात आई, वडील, भाऊ, चुलता, चुलती, आजी व आजोबा असा मोठा परिवार असून सोमनाथ उंबरकर याचा मुलगा, रामनाथ उंबरकर यांचा तो पुतण्या तर सचिन उंबरकर यांचा तो मोठा भाऊ होता. मंगळवारी सकाळी उंबरी बाळापूर येथिल स्मशानभूमीमध्ये अत्यंत शोकाकूल वातावरणात अत्यंसंस्कार करण्यात आले.

Web Title: young man died in a horrific accident on the Nashik-Pune National Highway

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here