Home अहमदनगर विषारी दारू पाजून तरुणाचा खून, वैद्यकीय अहवालात सिद्ध  

विषारी दारू पाजून तरुणाचा खून, वैद्यकीय अहवालात सिद्ध  

Murder of a young man by poisoning

अहमदनगर | Ahmednagar: दारू मध्ये विषारी अंश असल्याचा वैद्यकीय तपासणी अहवाल चार वर्षांनी प्राप्त झाल्याने भिंगार कॅम्प पोलिसांनी एकाचा खुनाचा गुन्हा रविवारी दाखल करण्यात आला.

रमेश उर्फ रमाकांत काळे वय ३५ रा. आलमगीर भिंगार असे या मृत तरुणाचे नाव आहे. या तरुणाचा २१ फेब्रुवारी २०१७ रोजी या तरुणाचा मृत्यू झाल्याची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. त्याचा शवविचेदन तपासणी अहवाल प्रतीक्षेत होता.

याप्रकरणी जावेद शेख रा. मिमीन गल्ली भिंगार व त्याच्या बरोबरील तीन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

जावेद शेख व त्याच्याबरोबर असलेल्या तीन अनोळखी व्यक्तींनी रमेश व त्याची पत्नी वंदना या दोघांना मेलेली बकरी तुम्हाला देतो असे सांगून दोघांना मोटारसायकलवर बसवून काटवनात नेले. तेथे मारहाण करत दारू पाजली. तो तेथेच बेशुद्ध पडला होता. नंतर त्याला उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तेथेच त्याचा मृत्यू झाला.

पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील हे करीत आहे.

Web Title: Murder of a young man by poisoning

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here