Home अहमदनगर बाळ बोठेला फरार घोषित करण्यासाठी पोलिसांकडून न्यायालयात अर्ज

बाळ बोठेला फरार घोषित करण्यासाठी पोलिसांकडून न्यायालयात अर्ज

court by the police to declare Bal Bothe absconding

अहमदनगर: राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्या व यशस्विनी महिला बिग्रेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठे फरार आहेत. ते पोलिसांना गुंगारा देत आहे. त्यामुळे त्याला फरार घोषित करण्यासाठी पोलिसांकडून न्यायालायात अर्ज दाखल केला जाणार असून त्यामुळे पोलिसांना बोठे यांच्या मालमत्तेवर नियंत्रण आणणे शक्य होणार आहे.

तपासी अधिकारी लवकरच या स्वरूपाचा अर्ज न्यायालयात सादर करतील अशी माहिती सोमवारी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.

३० नोव्हेंबर रोजी जातेगाव घाटात रात्री रेखा जरे यांचा गळा चिरून हत्या करण्यात आली. पोलीस तपासात हा खून सुपारी देऊन करण्यात आल्याचे समोर आले. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झालेली आहे.

मात्र मुख्य सूत्रधार पत्रकार बोठे हा २० दिवसांपासून फरार आहे. त्याच्या अटकेसाठी पोलीस विविध ठिकाणी छापे मारत आहेत. मात्र तो अजूनही पोलिसांना सापडलेला नाही. बोठे फरार असल्यामुळे रेखा जरे यांच्या खुनाचे खरे कारण समोर आलेले नाही.

Web Title: court by the police to declare Bal Bothe absconding

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here