Home अकोले जेष्ठ नेते मधुकरराव नवले व मीनानाथ पांडे यांचा कॉंग्रेसपक्षात प्रवेश

जेष्ठ नेते मधुकरराव नवले व मीनानाथ पांडे यांचा कॉंग्रेसपक्षात प्रवेश

Madhukarrao Navale and Minanath Pandey join the Congress

अकोले: जेष्ठ नेते मधुकरराव नवले व मीनानाथ पांडे यांनी अधिकृतरीत्या कॉंग्रेसपक्षात प्रवेश केला आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री बाळसाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा आज मुंबईत पार पडला. त्यांच्यासोबत अनेक जेष्ठ नेत्यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

मधुकरराव नवले व मीनानाथ पांडे यांच्या प्रवेश पक्षाने अकोले तालुक्यात कॉंग्रेस पक्षाला मोठी उभारी मिळणार आहे. यामुळे अकोले तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपाला चांगलाच धक्का मानला जातोय.

भरकटलेला पक्षी जसा घरट्यात परत येतो तसे आम्ही आमच्या घरी पोहोचलो अशी भावना जेष्ठ नेते मधुकरराव नवले यांनी व्यक्त केली. आम्ही सर्व कॉंग्रेस चळवळीतील कार्यकर्ते आहोत. भाजप आम्हाला कसे कसे तरी वाटते. कॉंग्रेस पक्षाशी आमची विचारप्रणाली मिळती जुळती आहे असे मत त्यांनी व्यक्त केलं.  

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात 

काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आज अहमदनगर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांनी शेकडो समर्थकांसह गांधी भवन येथे काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या सर्वांचे मी काँग्रेस पक्षात स्वागत करतो.

अकोले तालुक्यातील ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले, माजी जि. प. सदस्य, अगस्ती कारखान्याचे संचालक मिनानाथ पांडे, बुवासाहेब नवले, रमेश जगताप, मदन पथवे, रमेश पवार, भास्करराव दराडे, एकनाथ सहाणे यांचे मी काँग्रेस परिवारात स्वागत करतो.

एक महिन्यापासून दिल्लीत शेतक-यांचे आंदोलन सुरु आहे पण सरकार शेतक-यांशी चर्चा करत नाही. सरकारची भूमिका क्रूर व अडेलतट्टूपणाची आहे. भाजपचा खरा चेहरा समोर आला असून भाजपमधून मोठ्या प्रमाणात घरवापसी होणार आहे. भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

Web Title: Madhukarrao Navale and Minanath Pandey join the Congress

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here