इंजिनियर तरुणी मध्यरात्री कंपनीच्या गेटजवळ कारची वाट पाहत असता तेवढ्यात
पुणे: येरवाडा येथे एका कंपनीच्या गेटबाहेर ऑफिमधील काम संपवत घरी जाण्यासाठी कंपनीच्या गेट बाहेर एक तरुणी कारची वाट बघत असताना तरुणीच्या हातातील मोबाईल हिसकावून पळून जाणाऱ्या चोराला नागरिकांनी पकडून येरवाडा पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना घडली आहे. येरवाडा येथील आयबीएम कंपनीच्या गेटसमोर ही घटना घडली.
पुणे येथील शिफ्टमध्ये करणाऱ्या तरुणी आणि महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्हं निर्माण करणारी घटना येरवाडा येथे काल मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
राम केदार असे या २३ वर्षीय आरोपीचे नाव आहे. तरुणीच्या हातातील मोबाईल या आरोपीने अचानक पळविल्याने ही तरुणी घाबरली. तिने मोठमोठ्याने आरडाओरडा केला त्यावेळी आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी व कंपनीतील कर्मचारी यांनी चोराचा पाठलाग करत त्यास पकडले. याप्रकरणी या आरोपी येरवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अधिक तपास येरवाडा पोलीस करीत आहेत.
Web Title: Young Girl waiting for the car near the company gate at midnight