Home अहमदनगर Murder: संपूर्ण जिल्हा हादरला: वादातून तरुणाची दोघांकडून हत्या

Murder: संपूर्ण जिल्हा हादरला: वादातून तरुणाची दोघांकडून हत्या

Murder of a young man by two in an argument

शिर्डी | Murder: अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोघा जणांनी मिळून एका तरुणाची हत्या केल्याची घटना घडली आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेने शिर्डीसह संपूर्ण जिल्हा हादरला आहे.

अजय कारभारी जगताप असे या खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. आरोपी अक्षय सुधाकर थोरात वय २४, रोहित बंडू खरात या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

अजय जगताप हा काही वर्षापूर्वी शिर्डी येथे भीमनगरमध्ये राहत होता. सध्या तो संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे राहत होता. बहिणीला भेटण्यासाठी तो शिर्डीत आला होता. तीन दिवसांपूर्वी अजय याचा थोरात याच्याशी वाद झाला होता. मंगळवारी रात्री अजय जगताप वाद मिटविण्यासाठी अक्षय थोरात याच्या दुकानावर गेला होता. अक्षय दुकानात राहतो. त्यांच्यात चर्चा झाली वादही मिटला. यावेळी तेथे रोहित खरात उपस्थित होता. वाद मिटल्यानंतर तिघांनी पार्टी केली.

पार्टी झाल्यावर अक्षयने अजयला घरी जाण्यास सांगितले. मी इथेच झोपणार आहे असे सांगत अजय लघुशंकेसाठी बाहेर गेला. आणि पुन्हा दुकानात आला. त्यावेळी त्याच्या कमरेला कोयता असल्याचे अक्षय व रोहितच्या लक्षात आले. अजय आपल्याला मारेल या शंकेने रोहितने हिसकावून घेतला. त्यानंतर लगेचच वार करून अजयचा खून केला.

या घटनेनंतर रात्री एक वाजेच्या सुमारास अक्षय थोरात व रोहित खरात यांनी पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना खून केल्याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन खात्री केली आणि दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. अशी माहिती पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी दिली.

Web Title: Murder of a young man by two in an argument

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here