Home नागपूर Murder: लग्नात नाचत असताना झालेल्या वादातून तरुणाचा खून

Murder: लग्नात नाचत असताना झालेल्या वादातून तरुणाचा खून

Murder of a young man due to an argument

नागपूर | Nagpur : लग्नात नाचत असताना झालेल्या वादातून एका तरुणाची १२ वर्षीय अल्पवयीन मुलाने हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  गुरुवारी रात्री साडे आठच्या सुमारास ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी  गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  गुरुवारी रात्री साडे आठच्या सुमारास काटोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काटोल शहरातील अण्णाभाऊ साठेनगर परिसरात घडली. राहुल श्रावण गायकवाड (वय २७, रा, अण्णाभाऊ साठेनगर) असे या मयत तरुणाचे नाव आहे.  राहुल आणि एक १२ वर्षीय अल्पवयीन मुलगा हे या परिसरातील एका लग्नात नाचत होते. यावेळी या दोघांमध्ये वाद झाला. या मुलाने राहुलच्या छातीवर चाकूने वार केले. यात त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा (Murder Crime) गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Murder of a young man due to an argument

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here