Home अहमदनगर Heat Wave: उष्णतेच्या लाटेने नगरकर हैराण, जिल्ह्यात पारा ४४.५ अंश सेल्सिअसवर

Heat Wave: उष्णतेच्या लाटेने नगरकर हैराण, जिल्ह्यात पारा ४४.५ अंश सेल्सिअसवर

 

Ahmednagar heat wave, mercury in the district at 44.5 degrees Celsius

अहमदनगर | Ahmednagar:  मे महिना सुरु होण्याआधीच उष्णतेने (Heat Wave) लोकांना हैराण केले असून असून नगर जिल्ह्यात पारा ४४.५ अंश सेल्सिअसवर गेला आहे. मे महिन्यात पारा ४६ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.  सूर्य आग ओकत असल्याने नगरकर चिंता व्यक्त करीत आहे.

यंदाच्या हंगामात आतापर्यंत कालचा शुक्रवारचा दिवस सर्वाधिक उष्ण ठरला आहे. उन्हाच्या वाढत्या झळा या दुपारनंतर नाहीतर दिवस उजाडताच सुरू होत आहे. सूर्य आग ओकत असल्याने दुपारच्या वेळी शहरातील मुख्य रस्त्यांवर कमालीचा शुकशुकाट जाणवू लागला आहे. शेती कामांचेही नियोजन कोलमडले आहे. रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने मजूरही दुपारच्यावेळी दांडी करू लागले आहेत. रसवंती गृहे, आईस्क्रीम पार्लर तसेच शीतपेयांची दुकाने ग्राहकांनी फुलू लागली आहेत.

देशात पाऊस पाडून वाढणारं तापमान कमी करू शकेल अशी कोणतीही अनुकूल हवामान प्रणाली मोठ्या प्रमाणात नाही. उत्तर भारतातील उष्णतेच्या लाटेच्या झोनमधून उष्ण आणि कोरडे उत्तरेकडील वारे महाराष्ट्रात, विशेषत: विदर्भ आणि उत्तर मध्य महाराष्ट्र प्रदेशात प्रवेश करत आहेत. याच्यामुळं इथलं दिवसाचं तापमान सामान्यपेक्षा खूप जास्त नोंदवलं जात आहे, असं प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथील वरिष्ठ अधिकाऱ्यानं शुक्रवारी सांगितलं.

Web Title: Ahmednagar heat wave, mercury in the district at 44.5 degrees Celsius

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here