Home नागपूर प्राध्यापकाने विद्यार्थीनीला परिक्षेत उत्तीर्ण करतो असे अमिष देत केली शरीर सुखाची मागणी

प्राध्यापकाने विद्यार्थीनीला परिक्षेत उत्तीर्ण करतो असे अमिष देत केली शरीर सुखाची मागणी

professor lured the student to pass the exam and demanded Sex

नागपूर | Nagpur Crime: नागपूर जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. प्राध्यापकाने विद्यार्थीनीला परिक्षेत उत्तीर्ण करतो असे अमिष दाखवून शरीर सुखाची (Sex) मागणी केली आहे. नागपूरमधील सिंद्धू महाविद्यालयात ही घटना घडली आहे. दरम्यान या घटनेमुळे महाविद्यालयात एकच खळबळ उडाली आहे. या सगळ्या प्रकारामुळे पीडितेला मोठा मानसिक धक्का बसला आहे.

या घटनेनंतर संबंधित विद्यार्थींनीने आपल्या मित्र मैत्रीणींसह पाचपावली पोलीस स्टेशन गाठले आणि पोलिसांना संपूर्ण घटना सांगितली त्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे. राकेश गेडाम असे या प्राध्यापकाचे नाव असून त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्यात आतापर्यंत अशा प्रकारची प्रकरणे समोर आली आहे. या घटनेने पिडीत मुलीला मानसिक धक्का बसला आहे. प्राध्यापकाने विद्यार्थीनीकडे शरीर सुखाची मागणी केल्याने तिने थेट पाचपावली स्टेशन गाठले आणि त्यामुळे हे प्रकरण समोर आले. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहे.

Web Title: professor lured the student to pass the exam and demanded Sex

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here