Home संगमनेर Suicide | संगमनेर: शेतकऱ्याची लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

Suicide | संगमनेर: शेतकऱ्याची लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

Sangamner Farmer commits suicide by strangling a lemon tree

Sangamner | संगमनेर:  तालुक्याच्या साकूरपठार भागातील हिवरगांव पठार गावच्या शिवारात एका ४७ वर्षीय शेतकऱ्याने लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या (Suicide) केल्याची घटना शुक्रवार दि. २९ एप्रिल रोजी रात्री साडे आठ ते नऊ वाजेच्या सुमारास घडली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कारभारी उर्फ दादू आंबु चितळकर असे या आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे.

याबाबत घारगांव पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,  कारभारी उर्फ दादू आंबु चितळकर हे साकुर परीसरातील चितळकर वस्ती येथील रहीवासी आहे‌. त्यांनी हिवरगांव पठार गावच्या शिवारातील घाटाजवळ रोडच्या कडेला जंगलामध्ये लिंबाच्या झाडाला दोर बांधून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच घारगांव पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक संतोष खैरे , गणेश लोंढे , संतोष फड यांसह आदिंनी घटनास्थळी धाव घेतली व मृतदेह खाली उतरुन संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आला.

बाळु भागा चितळकर यांच्या खबरीवरुन घारगांव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल दशरथ वायाळ करत आहेत. दरम्यान कारभारी चितळकर यांनी आत्महत्या का केली हे मात्र अद्याप समजू शकले नाही.

Web Title: Sangamner Farmer commits suicide by strangling a lemon tree

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here