Home बीड धक्कादायक: प्रेमप्रकरणातून तरुणाचा आई अन् वडिलांसमोर भोसकून खून- Murder

धक्कादायक: प्रेमप्रकरणातून तरुणाचा आई अन् वडिलांसमोर भोसकून खून- Murder

Murder of a young man in front of his parents due to a love affair

बीड:  आई वडिलांसह आठवडी बाजारात जाणाऱ्या तरुणाला अडवून चाकूने हल्ला करत भोसकून खून (Murder) केल्याची घटना बीड तालुक्यातील पिंपळादेवी व नाथापूरदरम्यान शनिवारी सायंकाळी घडली. रविवारी  शविच्छेदन करण्यात आले. आरोपीच्या अटकेच्या मागणीसाठी आईसह नातेवाइकांनी पोलिस अधीक्षक कार्यालय गाठले होते. पिंपळनेर पोलिसांनी तीन जणांना ताब्यात  घेतले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार,  सुंदर साहेबराव कसबे (२२, रा. पिंपळादेवी ता. बोड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो ऊसतोड मजुरी करत होता. कर्नाटकातील एका कारखान्यावर दिवाळीनंतर तिथे त्याची ओळख लऊळ क्र. २ (ता. माजलगाव) येथील एका तरुणीशी झाली होती. त्याचे रूपांतर प्रेमात झाले. ऊसतोड सुरू असतानाच ते पळूनही गेले होते. मात्र, मुकादमाने त्याना शोधून आणले होते.

दरम्यान दोन महिन्यांपूर्वीच ऊस तोडीहून दोन्ही कुटुंबे गावी परतली होती. या साऱ्या प्रकारामुळे बाबासाहेब शिवाजी चांदणे याच्या मनात त्याच्याविषयी राग होता. २५ जून रोजी सुंदर कसबे आई व वडिलांसह नाथापूर येथील आठवडी बाजारासाठी जात असताना एका पेट्रोल पंपाजवळ शिवाजी चांदणे हे त्याच्या चार ते पाच सहकारीसह रिक्षातून तेथे आले. व सुंदरच्या दुचाकीला रिक्षा आडवी लावून सुंदर, त्याची आई व वडिलांना मारहाण केली.

तीन मुलींच्या पाठीवर झालेला घरातील कर्ता होता. त्याच्या  वडिलांवर काही दिवसांपूर्वीच हृदयाची शस्त्रक्रिया झाली आहे. मुलगा गेल्याने संतप्त नातेवाइकांनी  पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेतली.  नातेवाइकांनी आरोपींच्या अटकेच्या पोलिस अधीक्षक कार्यालयात येत आरोपीच्या अटकेची मागणी केली.

सुंदर हा मुलीला घेऊन गेल्यानंतर प्रकरण मुकादमांच्या मध्यस्थीने मिटले  होते. यासाठी मुलीकडच्या सुंदरच्या कुटुंबाकडून लाख रुपये घेतले. मुलीचे लग्न लावून  दिले. त्यानंतर शनिवारी सुंदरचा खून केला गेल्याचा  आरोप केला जात आहे.

Web Title: Murder of a young man in front of his parents due to a love affair

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here