Home अहमदनगर अहमदनगर : पंख्याला वीजप्रवाह उतरल्याने चिटकून मायलेकींचा जागीच

अहमदनगर : पंख्याला वीजप्रवाह उतरल्याने चिटकून मायलेकींचा जागीच

Due to the electric Shock falling on the fan, it sticks to the place 

अहमदनगर | शेवगाव | Shevgaon:  बोधेगाव येथील ढवाण गल्लीत विजेचा पंख्याला वीजप्रवाह उतरल्याने त्याला चिटकून  (electric Shock)मायलेकीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली.

स्वाती शरद उर्फ बुगा ढवाण (28) व त्यांची मुलगी गौरी शरद ढवाण (2, रा. दोघीही ढवाण गल्ली, बोधेगाव) असे मयत झालेल्या मायलेकींची नावे आहेत.

 याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बोधेगाव येथील मध्यभागी ढवाण गल्लीत राहणार्‍या या दोघी मायलेकी घरात असताना आई मुलीला जेवू घालत होती. घरात सुरू असलेल्या टेबल पंखा (फॅन) अंगावर पडला त्याचा वीज प्रवाह उतरल्याने दोघी मायलेकी त्याला चिटकल्या. ही बाब कोणाच्याही निदर्शनास न आल्याने त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

तिचे सासरे व पति शरद हे मोलमजुरीसाठी सकाळीच घरा बाहेर पडले  होते व गल्लीतील लगतचे शेजारी ही शेतीचे कामे सुरू असल्याने गल्लीत कोणी नव्हते गल्लीतील बोळीत असलेल्या घरात दोघीच मायलेकी असल्याने अनेक वेळ सदर घटना कोणाच्याही लक्षात आली नाही. गल्लीतील शेजारी घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती होताच मोठी गर्दी झाली होती. ही हृदयद्रावक घडल्याने  सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Due to the electric Shock falling on the fan, it sticks to the place 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here