Home पुणे Suicide | पत्नीचे अनैतिक संबंध पतीची गळफास घेऊन आत्महत्या, ९ जणांवर गुन्हा

Suicide | पत्नीचे अनैतिक संबंध पतीची गळफास घेऊन आत्महत्या, ९ जणांवर गुन्हा

Wife's immoral relationship Husband commits suicide by strangulation

Pune Crime | पुणे: सासरकडील मंडळींनी संगनमत करून वेळोवेळी भांडण करणे आणि पत्नीचे अनैतिक संबंध असल्याची माहिती समजल्याने मानसिक तणावातून तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे.

कोहिनूर शिंदे (रा. दत्तनगर, पिंपरी सांडस, हवेली) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी मृताच्या पत्नीसह ९ जणांवर गुन्हा दाखल (Crime Filed) केला आहे. याबाबत मृताचे वडील हिरू पांडू शिंदे (वय ५४, रा. दत्तनगर, पिंपरी सांडस, हवेली) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. हा प्रकार पिंपरी सांडस येथे २०२१ ते १ जून २०२२ दरम्यान घडला

याबाबत अधिक माहिती अशी की,  कोहिनूर शिंदे यास त्याच्या सासरकडील मंडळींनी संगनमत करून वेळोवेळी भांडण केले. त्याच्या पत्नीचे प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे मानसिक तणावातून कोहिनूर याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी  पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Wife’s immoral relationship Husband commits suicide by strangulation

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here