Home महाराष्ट्र सुप्रीम कोर्टाची बंडखोर आमदारांना नोटीस, ११ जुलैला होणार सुनावणी  

सुप्रीम कोर्टाची बंडखोर आमदारांना नोटीस, ११ जुलैला होणार सुनावणी  

Supreme Court issues notice to rebel MLA

मुंबई: महाराष्ट्रात सत्ता संघर्षाचा पेच कायम आहे. शिवसनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर आज युक्तिवाद करण्यात आला. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा मिळाला आहे. तूर्तास बंडखोर आमदारांचे निलंबन कारवाई होणार नाही असे स्पष्ट झाले आहे. ११ जुलैला होणार पुढील सुनावणी होणार असल्याने बंडखोर आमदारांना तोपर्यंत दिलासा मिळाला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदे गटाला फटकाले आहे.  न्यायालयाने एकनाथ शिंदे गटाला मुंबई उच्च न्यायालयात  का गेला नाही, अशी विचारणा केली आहे. तसेच, उपाध्यक्षांवर प्रश्न कसे उपस्थितीत करू शकता, असा सवालही केला आहे. सुप्रीम कोर्टाने उपाध्यक्ष यांना नोटीस बजावली असून यामध्ये सहाही पक्षांना नोटीस दिली आहे. (Supreme Court issues notice to rebel MLA) केंद्र सरकारला सुद्धा नोटीस दिली आहे. बंडखोर 16 आमदारांना सुद्धा नोटीस दिली आहे. या प्रकरणाची  सुनावणी पूर्ण होत नाही. तोपर्यंत त्यांनी आपल्या उत्तरांची तयारी करावी, अशी सूचना कोर्टाने दिली. पुढील सुनावणी 11 जुलै रोजी होणार आहे. तसंच पुढील पाच दिवसांमध्ये बंडखोर आमदारांना आपले प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहे.

या प्रकरणाची  सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांनी आपल्या उत्तरांची तयारी करावी, अशी सूचना कोर्टाने दिली.  बंडखोर आमदारांना प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार आहे.  शिवसेनेनं आमदारांना जी नोटीस बजावली आहे, जोपर्यंत सुनावणी होत नाही. तोपर्यंत कारवाई करू नये, असे निर्देशही कोर्टाने दिले आहे. उपाध्यक्ष झिरवळ यांना कागदपत्रे व प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे.   

Web Title: Supreme Court issues notice to rebel MLAs, hearing to be held on July 11

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here