Home महाराष्ट्र Eknath Shinde: सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर एकनाथ शिंदे यांचे ट्विट म्हणाले…

Eknath Shinde: सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर एकनाथ शिंदे यांचे ट्विट म्हणाले…

Eknath Shinde's tweet after the Supreme Court hearing

मुंबई: राज्यात शिवसेना पक्षातील एकनाथ शिंदे गटाच्या बंडखोरीमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शिवसेनेने केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली आहे. न्यायालयाने दोन्ही पक्षकारांना नोटीस बजावली आहे. ११ जुलैला पुढील सुनावणीची तारीख दिली आहे. ११ जुलैपर्यंत बंडखोर आमदारांनाही अपात्रही ठरवता येणार नाही. ज्या आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली, त्यांना उत्तर देण्यासाठी ११ जुलैच्या संध्याकाळपर्यंत वेळ सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.यानंतर एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

.शिंदे म्हणाले, ‘हा वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय’. शिंदे यांच्या नव्या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात चर्चेत आले आहे.

Web Title: Eknath Shinde’s tweet after the Supreme Court hearing

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here