Home पुणे Murder Case: भररस्त्यात धारदार शस्त्राने वार करून तरुणाचा खून

Murder Case: भररस्त्यात धारदार शस्त्राने वार करून तरुणाचा खून

Murder of a young man with a sharp weapon

खेड: रासे (ता. खेड) येथील वन विभागाच्या कच्चा रस्त्यावर अज्ञात इसमांनी ३४ वर्षीय तरुणाचा मानेवर व डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून निर्घुण खून (Murder) केल्याची घटना घडली आहे.

शशिकांत शिवाजी काशिद (वय ३४ वर्षे, रा. मातोश्री पार्क, रासे, ता. खेड, जि. पुणे) असे हल्ल्यात खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

चाकण पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,  सदर घटना शुक्रवार (दि. २४) ते शनिवारच्या (दि. २५) दरम्यान घडली आहेशशिकांत काशीद हे वनविभाग हद्दीतील रस्त्याने आपल्या दुचाकीवरून फिल्टर दुस्तीच्या कामासाठी जात होते. दरम्यान एकांताचा फायदा घेऊन अज्ञात हल्लेखोरांनी अज्ञात कारणांसाठी त्याचे मानेवर व डोक्यावर तरी धारदार शस्त्राने वार करून त्यांचा खुन केला. याप्रकरणी प्रशांत शिवाजी काशीद (वय ३२) यांनी चाकण पोलिसांत फिर्याद दिली आहे.

Web Title: Murder of a young man with a sharp weapon

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here