Home पुणे तरुणीला दारू पाजून लैंगिक अत्याचार, कंपनीतील सिनियर तरुणाने धमकी देत अत्याचार

तरुणीला दारू पाजून लैंगिक अत्याचार, कंपनीतील सिनियर तरुणाने धमकी देत अत्याचार

Sexual abuse of a young woman by drinking alcohol

पिंपरी: तरुणी काम करीत असलेल्या आयटी कंपनीतील सिनियर तरुणाने तरुणीला घरी नेऊन दारू पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार (sexual abuse) केला. तसेच तिचे फोटो असल्याचे सांगून पुन्हा लैंगिक अत्याचार केला आहे. सदर प्रकार ६ जून आणि १० जून रोजी रात्री बावधन येथे घडला.

अभिनव दिलीपकुमार शांडेल्य रा.बावधन मूळ रा. बिहार याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पिडीत तरुणीने शनिवारी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एका आय टी कंपनीत काम करत होते. आरोपी हा तरुणीचा सिनियर असून दोघांत ओळख झाली होती. आरोपीने पिडीत तरुणीला त्याच्या घरी नेऊन दारू पाजून बळजबरीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर तरुणीचे फोटो त्याच्याकडे असून व्हायरल करण्याची धमकी देऊन फोन करून बोलावून घेतले. त्यादिवशी देखील आरोपीने तरुणीवर पुन्हा लैंगिक अत्याचार केले. पुन्हा आरोपीने फोन करून घरी बोलाविले असता तरुणीने थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे.   

Web Title: Sexual abuse of a young woman by drinking alcohol

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here