Home पुणे अल्पवयीन मुलाने आईंच्या प्रियकराचा कोयत्याने खून करून काढला काटा- Murder

अल्पवयीन मुलाने आईंच्या प्रियकराचा कोयत्याने खून करून काढला काटा- Murder

minor boy murder his mother's lover with a scythe

पिंपरी | Pimpri: आईच्या प्रियकाराकडून मारहाण व शिवीगाळ होत असल्याने १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने प्रियकराचा काटा काढल्याची घटना समोर आली आहे. मुलाने कोयता चोरून आईच्या प्रियकराचा कोयत्याने वार करून निर्घुण खून (Murder) केला आहे. शनिवारी भोसरी येथे ही घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याच्या साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे.   

सुनील राणोजी जावळे वय २३, रोहित ज्ञानेश्वर सोनवणे वय १८ रा. दोघेही भोसरी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यासह १७ वर्षीय मुलावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दीपक गोपाळ वाघमारे वय २९ असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत दीपक याचे अल्पवयीन मुलाच्या आईसोबत प्रेमसंबध होते. दीपक वाघमारे हा दारू पिऊन अल्पवयीन मुलाला व त्याची बहिणीला शिवीगाळ करून मारहाण करीत होता. याचाच राग त्याच्या मनात होता. त्यामुळे अल्पवयीन मुलाने साथीदारांसह त्याचा काटा काढण्याचे नियोजन केले आहे. अल्पवयीन मुलाने नारळ पाणी विकणाऱ्या इसमाचा कोयता चोरी केला. अल्पवयीन मुलाने शुक्रवारी दीपक वाघमारे याला सांगितले की, त्याचे एका जणाकडे तीन हजार रुपये असून त्याने मला पैसे घेण्यासाठी खडी मशीन, मोकळ्या मैदानात भोसरी येथे बोलाविले. तुम्ही माझ्यासोबत चला असे सांगून दीपक याला मैदानात घेऊन जाऊन त्याच्यावर कोयत्याने वार केले. साथीदारांनी दगडाने मारून वाघमारे यांचा खून केला.

Web Title: minor boy murder his mother’s lover with a scythe

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here