Home अकोले Murder: अकोले तालुक्यातील खडकी येथे तरुणाचा खून

Murder: अकोले तालुक्यातील खडकी येथे तरुणाचा खून

Murder of a youth at Khadki in Akole

अकोले | Murder: अकोले तालुक्यातील खडकी येथे रविवारी रात्री तीन तरुणांनी काठ्या, गज, डोक्यात घालून तरुणाचा खून केल्याची घटना घडली आहे. अवैध दारू विक्रीच्या व्यवसायातून हा खून झाल्याने गावकरी संतप्त झाले होते.  याबाबत राजूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाळू भगवंता बांडे रा. खडकी असे या खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.  राजूर पोलीस स्टेशनला मयत तरुणाचे वडील भगवंत शंकर बांडे यांनी फिर्याद दिली असून या फिर्यादीनुसार, रविवारी सायंकाळी आरोपी भीमा चिंतामण बांडे, हरिश्चंद्र बाजीराव बांडे, स्वप्नील भीमा बांडे यांनी संगनमत करून हातात लोखंडी पाईप, गज, काठ्या घेऊन आमच्या घरासमोर येऊन मुलगा वाळू भगवंत बांडे, काळू भगवंत बांडे, बाळू भगवंत बांडे यांना जोरदार मारहाण करण्यात आली. या मारहाणीत वाळू बांडे याच्या डोक्यात गज लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे मुले यांना हाताला व डोक्याला लागल्याने जखमी झाले. या फिर्यादीवरून राजूर पोलिसांनी तिघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Murder of a youth at Khadki in Akole

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here