Home महाराष्ट्र पुणे येथील सॅनिटायझर तयार करणाऱ्या कंपनीला भीषण आग, २० जणांचा मृत्यू

पुणे येथील सॅनिटायझर तयार करणाऱ्या कंपनीला भीषण आग, २० जणांचा मृत्यू

fire broke out at a sanitizer company in Pune

पुणे | Fire: पौंड रस्त्यावरील घोटवडे फाट्याजवळील उरवडे रोड येथे  एका सॅनिटायझर तयार करणाऱ्या कंपनीला आज सोमवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत २० जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. यामध्ये महिला कामगारांचा समावेश आहे. काही कामगार अडकल्याने मृतांची संख्या वाढण्याची भीती वाटत आहे.

ही आग कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही. सॅनिटायझर व ज्वलनशील रसायन साठा असल्याने आगीची तीव्रता जास्त होती. जेसीबीच्या सहाय्याने भिंत तोडून कामगारांना बाहेर काढण्यात आले. अचानक आग लागल्याने बघ्यांची मोठी गर्दी होती. अग्निशामक दलाच्या गाड्या तातडीने रवाना झाल्या. सायंकाळ पर्यंत २० कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. १० कामगारांना बाहेर काढण्यात यश आले आहे. सायंकाळी साडे सात वाजता आग आटोक्यात आली. मृत्यूचा नेमकी आकडा समजेल असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: fire broke out at a sanitizer company in Pune

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here