Home महाराष्ट्र महाराष्ट्रात आज इतक्या नव्या रुग्णांची वाढ, मोठा दिलासा

महाराष्ट्रात आज इतक्या नव्या रुग्णांची वाढ, मोठा दिलासा

New patients in Maharashtra today coronavirus

मुंबई | Maharashtra today coronavirus: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले होते, रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. कोरोना प्रादुर्भाव करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारला यश आल्याचे दिसून येतंय. राज्यात आज नवीन १०,२१९ रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील कोरोना संक्रमण कमी होत असल्याचे चित्र जहाल आहे.

राज्यात आज दहा हजार २१९ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर १५४ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूदार १.७२ इतका झाला आहे. राज्यात सध्या १,७४,३२० रुग्ण सक्रीय आहेत. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५८,४२,००० इतकी झाली आहे. राज्यात आज २१,०८१ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. आतापर्यंत राज्यात ५५,६४,३४८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.२५ इतके झाले आहे.

मुंबईतील रुग्णसंखेत कमालीची घट झाली आहे. मुंबईत सध्या १६ हजार ७० रुग्ण उपचार घेत आहेत. आज दिवस भरात ७९४ रुग्णांची नोंद झाली आहे.

Web Title: New patients in Maharashtra today coronavirus

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here