Home क्राईम Murder: संगमनेर खुर्द येथे किरकोळ कारणातून तरुणाचा खून  

Murder: संगमनेर खुर्द येथे किरकोळ कारणातून तरुणाचा खून  

Murder of a youth for trivial reasons at Sangamner Khurd

Sangamner | संगमनेर: संगमनेर खुर्द येथे दोन तरुणांमध्ये किरकोळ वादातून झालेल्या भांडणातून एकाचा खून (Murder) झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपीला संगमनेर शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

प्रकाश दुर्योधन गोफणे वय ३२ असे या खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, हनुमान जयंतीच्या दिवशी सायंकाळी साडे पाच ते सकाळी सात वाजेदरम्यान संगमनेर खुर्द येथील सुपेकर वस्ती येथे हा प्रकार घडला. हनुमान जयंती निमिताने सप्ताह बसला होता. त्याठिकाणी आरोपी सुरज सोमनाथ जेडगुले वय १८ रा. संगमनेर खुर्द हा दारू पिऊन आल्याने त्याचे व प्रकाश गोफणे या दोघांत भांडण झाली. प्रकाश याने जेडगुले याच्या तोंडावर दांड्याने वार केले. याचा राग आल्याने जेडगुले याने प्रकाश याचा हत्याराने निर्घुण खून केला. सदर घटनेत प्रकाश हा जखमी झाला होता. नातेवाईक यांनी त्याला रुग्णालयात दाखल केले मात्र त्याचा मृत्यू झाला. याबाबत त्याचा भाऊ शंकर गोफणे याने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यावरून पोलिसांनी सुरज सोमनाथ जेडगुले याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.  

Web Title: Murder of a youth for trivial reasons at Sangamner Khurd

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here