Home संगमनेर संगमनेरातील घटना: पैशासाठी विवाहीतेचा केला खून

संगमनेरातील घटना: पैशासाठी विवाहीतेचा केला खून

Sangamner Murder of a married woman for money

संगमनेर | Sangamner: टायरचे दुकान मोठे करण्यासाठी माहेरुन 5 लाख रुपये आणावेत या कारणासाठी एका 26 वर्षीय विवाहीतेचा सासरच्या मंडळींनी शारीरिक व मानसिक छळ करुन जीवे (Murder)  मारल्याची घटना संगमनेर तालुक्यातील सोनेवाडी येथे घडली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात पतीसह पाच जणांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे. तर पती व भाया या दोघांना पोलिसांनी अटक करण्यात आली आहे.

सौ. रविना सुनिल सांगळे (वय 26, रा. सोनेवाडी, ता. संगमनेर) असे मयत विवाहीतेचे नाव आहे. याबाबत मयत विवाहीतेचे वडील शांताराम बबन वणवे (रा. जांभूळवाडी मळा हिवरगाव पठार, ता. संगमनेर) यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

रविना हिचे सुनिल बबन सांगळे याचेबरोबर विवाह झाला होता. विवाहाच्या एक वर्षानंतर रविनाला शारीरिक व मानसिक छळ सुरु झाला. सुनिल सांगळे याचे घुलेवाडी येथे टायरचे दुकान आहे. सदर टायरचे दुकान हे मोठे करण्यासाठी तिने माहेरुन 5 लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी तिचा वारंवार छळ सुरु होता. शिवीगाळ करुन तिला मारहाण केली जात होती. पती सुनिल बबन सांगळे, सासरा बबन दत्तात्रय सांगळे, सासू मंदाबाई बबन सांगळे, भाया तान्हाजी बबन सांगळे, नणंद अर्चना सुधीर जायभाये (सर्व रा. सोनेवाडी, ता. संगमनेर) यांनी तिला वारंवार उपाशी पोटी ठेवून शिवीगाळ करत दि.15 एप्रिल 2022 रोजी रात्री 8 वाजेनंतर बेदम मारहाण करुन जिवे ठार मारले.

या फिर्यादीवरुन तालुका पोलिसांनी पती सुनिल बबन सांगळे, सासरा बबन दत्तात्रय सांगळे, सासू मंदाबाई बबन सांगळे, भाया तान्हाजी बबन सांगळे, नणंद अर्चना सुधीर जायभाये (सर्व रा. सोनेवाडी, ता. संगमनेर) यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 144/2022 भारतीय दंड संहिता 302, 304 (ब), 498 (अ), 34 प्रमाणे दाखल केला आहे. पुढील  तपास पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित ठाकरे हे करत आहे.

Web Title: Sangamner Murder of a married woman for money

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here