Home अहमदनगर संगमनेर ब्रेकिंग: तालुक्यात धारदार शस्त्राने तरुणाचा खून

संगमनेर ब्रेकिंग: तालुक्यात धारदार शस्त्राने तरुणाचा खून

Murder of a youth with a sharp weapon in Sangamner taluka

Sangamner | संगमनेर: संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी शिवारातील जावळे वस्तीनजीक एका टायर पंचर काढणाऱ्या तरुणाचा धारदार शस्राने खून (Murder) केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे. ही धक्कादायक घटना गुरुवारी रात्री ते शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. अब्दुल मोहम्मद युनिस कादीर वय २७ रा. चंदनापुरी ता. संगमनेर असे या खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. सदर तरुण हा परप्रांतीय बिहार येथील असल्याचे माहिती समजते. अज्ञात कारणातून हा खून करण्यात आला आहे.

या घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक पांडूरंग पवार घटनास्थळी दाखल झाले यावेळी मयत कादीर याच्या डोक्याच्या पाठीमागील बाजूने लागलेले व रक्त येत असल्याचे आढळून आले. व त्याठिकाणी रक्ताने माखलेली लोखंडी टामी व एक सुरा आढळून आला. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून अधिक तपास करीत आहे.    

Web Title: Murder of a youth with a sharp weapon in Sangamner taluka

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here