Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग: डोक्यावर प्रहार करून तरुणाचा खून

अहमदनगर ब्रेकिंग: डोक्यावर प्रहार करून तरुणाचा खून

Kopargaon Murder of a young man by hitting him on the head

Ahmednagar News | Koaprgaon | कोपरगाव: कोपरगाव तालुक्यातील पूर्वेस असलेल्या कोकमठाण ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या शिवारात रात्रीच्या सुमारास झारखंड हाजिराबाद जोघी सीमारा येथील तरुण सोहन युगुल भासके वय २२ याच्या डोक्यावर प्रहार करून खून (Murder) केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्याच्या सहकाऱ्यानेच त्याचा मोबाईल घेण्याच्या कारणावरून कामावरील पट्टी व छोटा हातोडा याच्या सहायाने हा खून केला असल्याचे उघड झाले आहे. आरोपीला कोपरगाव पोलिसानी २४ तासांच्या आत जेरबंद केले आहे. आरोपी रबन भासके वय २४ याने खून केल्याची कबुली दिली आहे.

याबाबत माहिती अशी की, याबाबत पोहेगाव येथील पर्यवेक्षक पुंजाजी गायकवाड यांनी कोपरगाव शहर [पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी शिवलिंग गायकवाड हा पोहेगाव येथील रहिवासी असून कोकमठाण हद्दीत महावितरणच्या पारेषण विभागाचे टावर उभारणीचे काम सुरु होते. सदरचे काम वेगाने सुरु असून त्याठिकाणी मयत तरुण सोहन भासके हा काम करण्यासाठी झारखंड येथून आपल्या साथीदारांसह आला होता. तो आपले काम आटोपून घरी जात असताना काही तरी अज्ञात कारणाने त्याच्या डोक्यावर जोरदार प्रहार झाला. यात तो मृत्यूमुखी झाला. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे हे करीत आहे.

Web Title: Kopargaon Murder of a young man by hitting him on the head

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here