Home अकोले धनादेश अनादरप्रकरणी अकोले न्यायालयाकडून व्यावसायिकास २० लाखांचा दंड

धनादेश अनादरप्रकरणी अकोले न्यायालयाकडून व्यावसायिकास २० लाखांचा दंड

Akole court fines businessman Rs 20 lakh

Ahmednagar Akole | अकोले: अकोले येथील व्यावसायिक भागीदार अमित भारत रासने यास अकोले न्यायालयातून (Akole court) धनादेश अनादर प्रकरणी दाखल दाव्याच्या निकालात २१ लाख रुपयांचा दंड व १ वर्षाच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

अकोले येथील तदर्थ दोन न्यायालयाचे फौजदारी व दिवाणी न्यायाधीश राहुल गायकवाड यांच्या समोर चाललेल्या खटल्यात आरोपी अमित भारत रासने यांच्यावर धनादेश अनादरप्रकरणी दाखल दाव्यातील दोन्ही बाजूकडील पुरावे साक्षीदार व युक्तिवाद ऐकून हा निकाल देण्यात आला. या खटल्यात फिर्यादीकडून वकील एन. के खतीब यांनी काम पाहिले,

अमित रासणे याच्या मालकीचे अकोले शहारातील बाजारपेठेत गाळा मिळकत नंबर २४०/२ व २४०/३ या फिर्यादी विजय काशिनाथ पोखरकर यांना विश्वासात घेऊन विकण्याचा व्यवहार झाला. खरेदी विक्री व्यवहारात आरोपीने विसारापोटी फिर्यादीकडून मिळकतीवरील दि संगमनेर मर्चंट को ओपरेतीव्हबँक लिमिटेड शाखा अकोलेचे कर्ज असल्याने ते भरण्यासाठी १५ लाखांची रक्कम विसारपावतीवर विसारापोटी घेतली. बँक कर्ज भरणा केल्यानंतर गाळे खरेदी दुयाम निबंधक कार्यालयात करून देण्याचे आश्वासन दिले. मात्र यानंतर प्रत्यक्षात सदरचे गाळे आरोपीने ठरविल्याप्रमाणे फिर्यादीस विक्री न करता त्रयस्थ व्यक्तीस परस्पर विक्री केले. आपली फसवणूक केल्याबद्दल फिर्यादीने आरोपीस मी तुमच्या विरुद्ध फौजदारी व दिवाणी स्वरुपाची कारवाई करेल असे सांगितल्यानंतर आरोपी अमित रासणे याने फिर्यादीस मी तुमची पूर्ण रक्कम परत करतो असे सांगून तडजोड घडवून २० लाख १५ हजार रुपयांचा नगर अर्बन बँक शाखा अकोले स्वतःच्या खात्यावरील धनादेश हा फिर्यादीस देणे रक्कम वसूल करण्यापोटी दिला. सदर धनादेश बँकेत भरल्यानंतर आरोपीच्या खात्यात पुरेशी रक्कम शिल्लक नसल्याने तो न वटता परत आला. यामुळे फिर्यादीने रासणे यांच्याविरुद्ध अकोले न्यायालयात खटला दाखल केला.   

Web Title: Akole court fines businessman Rs 20 lakh

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here