Home क्राईम संगमनेर: पत्नीची हत्या प्रकरणी शिक्षा भोगलेल्या आरोपीने अनैतिक संबंधातून पुन्हा एक हत्या

संगमनेर: पत्नीची हत्या प्रकरणी शिक्षा भोगलेल्या आरोपीने अनैतिक संबंधातून पुन्हा एक हत्या

wife's murder case commits another murder out of immoral relationship

Sangamner Murder Case | संगमनेर: अनैतिक संबधातून एका महिलेची हत्या केल्याचे समोर आले आहे. पत्नीची हत्या प्रकरणातील शिक्षा भोगलेल्या आरोपीने अनैतिक संबंधातून पुन्हा एक हत्या केल्याची धक्कादायक घटना रानमळा (जुन्नर) येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणाचा उलगडा करण्यात आळेफाटा पोलिसांना अवघ्या एक तासात तपास करून उलगडा केला आहे.  अनैतिक संबंधातून महिलेची हत्या करण्यात आले असल्याचे तपासात समोर आले आहे.

याबाबत आळेफाटा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, संतोष बबन मधे (वय 38, हल्ली राहणार रानमळा (जुन्नर), मूळ राहणार केळेवाडी ता. संगमनेर जिल्हा अहमदनगर) असे आरोपीचे नाव आहे. मयत महिला (वय 40, हल्ली रा. रानमळा मूळ राहणार मांडवळ वासुंदे ता. पारनेर, जिल्हा अहमदनगर) व आरोपी संतोष मधे यांच्यात अनैतिक संबंध (immoral relationship) होते त्यामुळे ते दोघे रानमळा (जुन्नर) येथे राहत होते.

संतोष हा वारंवार दारू पिऊन या महिलेला शिवीगाळ, मारहाण करून त्रास देत असल्याने ती रानमळा परिसरातील एका शेताच्या कडेला राहत होती. संतोषला याचा राग आल्याने बुधवारी (2 फेब्रवारी) पहाटेच्या दरम्यान त्याने या महिलेच्या डोक्यात तसेच तोंडावर धारदार शस्त्राने वार करुन खून (Murder) केला. याप्रकरणी मयत महिलेच्या वडिलांनी आळे फाटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे, या फिर्यादीवरुन संतोष मधे याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 34/2022 भारतीय दंड संहिता 302 नुसार दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.

Web Title: wife’s murder case commits another murder out of immoral relationship

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here