अहमदनगर हादरले! चाकूने वार करीत बापासह भावाचा खून
Breaking News | Ahmednagar Crime: मुलानेच पोटात चाकूने वार करून वडिलांचा आणि त्याच्या भावाचा खून (Murder) केल्याची घटना.
श्रीगोंदा: तालुक्यातील सुरेगाव येथे मुलानेच दारूच्या नशेत पित्यासह भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली. घडाळ्या हिरामण चव्हाण (वय ५०) व महावीर घडाळ्या चव्हाण (वय २७) अशी मयतांची नावे आहेत. याप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून खून करणारा जावेद घडाळ्या चव्हाण (वय ३०) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दरम्यान स्वस्तात सोने देण्याच्या प्रकरणातील अनेक गुन्ह्यांत महत्वाचे संशयित आरोपी असलेल्या कुटुंबातच ही घटना घडली आहे. सुरेगाव येथे घडाळ्या हिरामण चव्हाण हे आपल्या कुटुंबांसोबत राहत होते. दाँड तालुकासह श्रीगोंदा तालुक्यातील अनेक ठिकाणी घडलेल्या स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने लूट प्रकरणात त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची नावे समोर आली होती. त्यांच्या परातील वादामुळे घडाळ्या याची सून नांदत नव्हती त्यामुळे गुरूवारी रात्री त्यांचा मुलगा जावेद हा दारू पिऊन त्याची नांदत नसलेली पत्नी आणण्यासाठी पिता घडाळ्या यांच्याकडे पैशाची मागणी करत होता. मात्र त्यांनी पैसे देणार नसल्याचे सांगताच त्यांच्यात वाद झाला. भांडणे सुरू असताना भाऊ महावीर मध्यस्थी करण्यासाठी गेल्यावर जावेद याने त्याच्या जवळील चाकूने महाबीर यांच्या पोटात वार करून त्यांना जीवे मारले. ते पाहून मुलाला वाचविण्यासाठी घडाळ्या हे गेले असता त्यांच्याही पोटात चाकूने वार करून त्यांचाही खून केला.
खून केल्यावर महावीर घटनास्थळावरून पसार झाला, याबाबतची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाताच त्यांनी तांत्रिक माहिती मिळवून काही तासातच त्याला ताब्यात घेतले असून त्यास बेलवंडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. बेलबंडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
Web Title: Murder of father and brother by stabbing
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study