Home अहमदनगर लोणी: बिबट्याला दारात बघून युवक बेशुद्ध

लोणी: बिबट्याला दारात बघून युवक बेशुद्ध

Breaking News | Ahmednagar: घराच्या गेटमध्ये बिबट्या बघून त्यांचा अठरा वर्षाचा मुलगा अथर्व बेशुद्ध पडल्याची घटना. लोणीत बिबट्याची दहशत कायम, परिसरात भीतीचे वातावरण. 

young man fainted after seeing the leopard at the door

लोणी: सहा दिवसांपूर्वी लोणी बुद्रुक येथे बिबट्याने नऊ वर्षीय मुलाचा बळी घेतल्यानंतर वनविभागाच्या अनेक टीम कार्यरत होऊनही एकही बिबट्या जेरबंद होऊ शकलेला नाही. त्यातच शुक्रवारी सायंकाळी गावालगत बळीनारायण रस्त्यावरील मेहेत्रे यांच्या घराच्या गेटमध्ये बिबट्या बघून त्यांचा अठरा वर्षाचा मुलगा अथर्व बेशुद्ध पडल्याची घटना घडल्याने गावातील बिबट्याची दहशत कमी होण्याऐवजी आणखी वाढली आहे.

गेल्या रविवारी राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक गावातील पद्मभूषणनगर मध्ये अथर्व लहामगे या नऊ वर्षाच्या मुलावर हल्ला करून बिबट्याने त्याचा बळी घेतला होता. या घटनेने लोणी परिसर हादरून गेला. वन विभागाच्या अनेक टीम गावात दाखल झाल्या. ड्रोन कॅमेरे, दहा पिंजरे आणि इतर सर्व प्रकारच्या यंत्रणा कार्यरत झाल्या. मात्र सहा दिवस उलटूनही एकही बिबट्या जेरबंद होऊ शकला नाही. लोकांना दररोज विविध ठिकाणी बिबटे दर्शन देत आहेत मात्र वन विभाग प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही बिबट्या जेरबंद होत नाही.

त्यातच शुक्रवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास लोणी बु गावालगत बळीनारायन रस्त्यावरील सोमनाथ मेहेत्रे यांचा अठरा वर्षांचा मुलगा अधर्थ घराच्या दारात उभा असताना बिबट्या समोर येऊन उभा राहिला. गेट बंद असल्याने तो वाचला मात्र बिबट्याला बघून तो जोरात ओरडला आणि तिथेच बेशुद्ध पडला. त्याचे आई-वडील आणि आजीने त्याच्या तोंडावर पाणी मारून त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला, तो फक्त वाघ  वाघ असच म्हणत राहिला. शेवटी त्याला खाजगी दवाखान्यात नेण्यात आले. वन विभागाला माहिती देताच त्यांची टीम घटनास्थळी पोहचली. बन परिक्षेत्र अधिकारी सागर केदार यांनी बिबट्याचे पायाचे ठसे बघितल्यावर त्यांची खात्री पटली. आजूबाजूच्या परिसरास बिबट्याचा शोध सुरू करण्यात आला. तातडीने या भागात पिंजरा लावण्यात आला आहे. लोणीत बिबट्यांची मोठी संख्या असून एकही बिबट्या जेरबंद होत नसल्याने बनविभाग हतचल झाला आहे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन ते करीत असून एकामागून एक घटना पड़त असल्याने नागरिकांमधील भीतीचे बातावरण कमी व्हायला तयार नाही.

Web Title: young man fainted after seeing the leopard at the door

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here