Home अहमदनगर पतीसमोरच महिलेवर अत्याचार, रस्त्यात अडवून दाम्पत्याला बेदम मारहाण

पतीसमोरच महिलेवर अत्याचार, रस्त्यात अडवून दाम्पत्याला बेदम मारहाण

Breaking News: तीन अज्ञातांनी रस्त्यात अडवून दाम्पत्याला बेदम मारहाण करीत पती समोरच महिलेवर अत्याचार केल्याची घटना.

Abused the woman in front of her husband

आष्टी: राज्यात महिलांवरील अत्याचार घटनांत वाढ होत असताना आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अहमदनगरवरून गावाकडे दुचाकीवरून जाताना तीन अज्ञातांनी रस्त्यात अडवून दाम्पत्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर ३८ वर्षीय महिलेवर जबरदस्तीने अत्याचार केला. ही धक्कादायक घटना गुरूवारी (दि.१८) रात्री साडेदहाच्या दरम्यान नांदुर विठ्ठलाचे रस्त्यावर घडली. या घटनेने खळबळ उडाली आहे. 

महिला व तिच्या पतीवर अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.

याबाबत अधिक माहिती अशी की, आष्टी तालुक्यातील एका गावात वास्तव्यास असलेले एक दाम्पत्य गुरूवारी कामानिमित्त अहमदनगरला गेले होते. रात्री उशिरा गावाकडे येत असताना बीड- नगर राष्ट्रीय महामार्गावरील नांदुर विठ्ठलाचे रस्त्यावर अज्ञात तिघा जणांनी दुचाकी अडवत दाम्पत्याला बेदम मारहाण करून महिलेवर अत्याचार केला. ही माहिती अंभोरा पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन दोघांनाही उपचारासाठी अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.  पुढील तपास अंभोरा पोलिस ठाण्याचे सपोनि महादेव ढाकणे करत आहेत.

Web Title: Abused the woman in front of her husband

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here