Home महाराष्ट्र धक्कादायक! रिक्षाचालकाने प्रेयसीचा चिरला गळा अन..

धक्कादायक! रिक्षाचालकाने प्रेयसीचा चिरला गळा अन..

Breaking News | Mumbai Crime: ४० वर्षीय प्रियकराने आपल्या २९ वर्षीय प्रेयसीचा गळा चिरून हत्या केल्याची घटना.

boyfriend killed his 29-year-old girlfriend by slitting her throat

मुंबई: मुंबई मालाड पूर्व कुरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत माथेफिरू प्रियकराने प्रेयसीवर चाकूने हल्ला करीत हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  या हल्ल्यात प्रेयसी गंभीर जखमी झाली आणि नंतर तिचा मृत्यू झाला.  प्रेयसीवर हल्ला केल्यानंतर प्रियकराने स्वतःवर देखील हल्ला करून जखमी करून घेतले आहे. प्रियकर बाबुराव मोरे असे आरोपीचे नाव आहे.

या प्रकरणी जखमी तरुणीच्या तक्रारीनंतर कुरार पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी प्रियकर बाबुराव मोरे याला ताब्यात घेतलं असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, २९ वर्षीय मयत तरुणी पुणे जिल्ह्यात राहणारी असून दारुड्या नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून ती पुणे परिसरात वेगळी राहत होती. तिच्याच गावातील बाबुराव मोरे याच्यासोबत तिचे प्रेमसंबंध जुळले, बाबुराव मोरे मैना गिरीला सोबत घेऊन मुंबईच्या कांदिवली शांतीनगर परिसरात भाड्याने राहत होता. बाबूराव रिक्षा चालवायचा. तीन वर्षांपासून दोघेही लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहत होते. गुरुवारी बाबुराव मोरे यांनी एक धारदार चाकू विकत घेतला आणि मैना गंभीर जखमी केलं. या हल्ल्यात तरुणी जागेवरच मृत पावली. यानंतर बाबुरावने स्वतःवर देखील चाकूने वार केले. यात तो देखील जखमी झाला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन पुढील चौकशी केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.

Web Title: boyfriend killed his 29-year-old girlfriend by slitting her throat

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here