Home अहमदनगर Murder: चारित्र्यावर संशय घेणार्‍या सासर्‍याचा सूनेकडून खून

Murder: चारित्र्यावर संशय घेणार्‍या सासर्‍याचा सूनेकडून खून

Murder of father-in-law who suspects his character

अहमदनगर | Murder: नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील शिवारात चारित्र्यावर संशय घेणार्‍या सासर्‍याचा सूनेकडूनच खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  मंगळवारी सकाळी ही घटना घडली आहे. 

अर्जुन गोविंद हजारे (वय 62 रा. चिचोंडी पाटील) असे खून झालेल्या सासऱ्याचे नाव आहे. त्यांची सून ज्योती अतुल हजारे (रा. चिंचोडी पाटील) हिच्याविरूद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  सून ज्योती अतुल हजारे हिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याप्रकरणी बाबासाहेब चंदु बनकर (वय 42 रा. पिंपळगाव माळवी ता. नगर) यांनी फिर्याद दिली आहे. अर्जुन हजारे हा सून ज्योतीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यावरून मंगळवारी सकाळी त्यांच्यात वाद झाले. भाऊ गुजाबा हजारे यांच्या घरासमोरील रस्त्यावर हे भांडण सुरू होते. या भांडणामध्ये ज्योती हिने अर्जुन हजारे यांच्या डोक्यात, कपाळावर, तोंडावर दगड व कुर्‍हाडीने मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या अर्जुन हजारे यांचा मृत्यू झाला आहे. शवविच्छेदनसाठी मृतदेह जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आला होता.

ब्रेकिंग: अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग अपडेट वाचण्यासाठी  संगमनेर अकोले न्यूज नवीन सुपर फास्ट स्वरूपात आजच आपला  अॅप येथून अपडेट करा.   संगमनेर अकोले न्यूज 

दरम्यान घटनेची माहिती मिळताच नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक अजित पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, नगर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे, पोलीस उपनिरीक्षक चव्हाण, बोराडे यांनी घटनास्थळी भेट दिली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बोराडे करीत आहे.

Web Title: Murder of father-in-law who suspects his character

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here