Home Accident News संगमनेर: पुणे नाशिक महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन ठार एक जखमी

संगमनेर: पुणे नाशिक महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन ठार एक जखमी

Sangamner Two killed, one injured in Pune-Nashik highway Accident 

संगमनेर | Accident :  पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील वरूडी फाट्या पासून काही अंतरावर अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोन जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात मंगळवार ता.२३ नोव्हेंबर रोजी दुपारी घडला  हा अपघात इतका भीषण होता की महामार्गावर रक्ताचे थारोळे साचले होते.

याबाबत डोळासणे महामार्ग पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मंगळवारी पापा अब्दुलकरीम मनियार, अन्सार अब्दुलकरीम मनियार व त्यांचा जोडीदार नाव समजू शकले नाही असे तिघे जण दुचाकीवरून संगमनेर कडे येत होते  दुपारी पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील वरूडी फाट्या पासून काही अंतरावर गेले असता त्या वेळी अज्ञात वाहणाने दुचाकीला जोराची धडक दिल्यामुळे भीषण घडला. या अपघातात पापा अब्दुलकरीम मनियार, व अन्सार अब्दुलकरीम मनियार दोघे रा.तळेगाव दिघे हे जागीच ठार झाले असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. घटनास्थळी परिसरातील नागरिकांसह वाहण चालकांनीही मोठी गर्दी केली होती.

घटनेची माहिती समजताच घारगाव पोलीस व डोळासणे महामार्गाचे पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस योगीराज सोणवने, नंदकुमार बर्डै यांनी घटनास्थळी धाव घेतली.

ब्रेकिंग: अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग अपडेट वाचण्यासाठी  संगमनेर अकोले न्यूज नवीन सुपर फास्ट स्वरूपात आजच आपला  अॅप येथून अपडेट करा.   संगमनेर अकोले न्यूज 

Web Title: Sangamner Two killed, one injured in Pune-Nashik highway Accident 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here