Home औरंगाबाद धक्कादायक! जावयाने केली सासऱ्याची भोसकून हत्या

धक्कादायक! जावयाने केली सासऱ्याची भोसकून हत्या

Breaking News | Murder: माहेरी आलेल्या पत्नीची समजूत काढून तिला सासरी नेण्यासाठी आलेल्या तरुणाने सासऱ्याचीच चाकूने भोसकून हत्या केल्याची खळबळजनक घटना.

Murder son-in-law stabbed the father-in-law to death

छत्रपती संभाजीनगर : रागाच्या भरात माहेरी आलेल्या पत्नीची समजूत काढून तिला सासरी नेण्यासाठी आलेल्या तरुणाने सासऱ्याचीच चाकूने भोसकून हत्या केल्याची खळबळजनक घटना शनिवारी (दि. २) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास चिकलठाणा येथे उघडकीस आली. या प्रकरणी आरोपी जावयाविरुद्ध सिडको पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दत्ता रामभाऊ पाटोळे (३६, रा. पीरबावडा, ता. फुलंब्री) असे आरोपी जावयाचे नाव आहे.

या घटनेबाबतची अधिक माहीती अशी की, सूर्यभान फकीरचंद रिठे (५२, राहणार धनगर गल्ली चिकलठाणा) यांची मुलगी सुनिता हिचा दत्ता रामभाऊ पाटोळे (३६, राहणार पीरबावडा ता. फुलंब्री) यांच्यासोबत विवाह झाला होता. मात्र सुनिता हिला जावई दत्ता पाटोळे हा सततचा त्रास होता. दोघांमध्ये सतत शुल्लक कारणावरून वाद होत. दत्ता हा मुलीस मारहाण करीत होता. त्यामुळे सूर्यभान रिठे यांनी मुलीला माहेरी आणले होते. गेल्या दीड महिन्यापासून सुनिता माहेरी राहत होती. त्यामुळे दत्ता पाटोळे यांनी नातेवाईक मध्यस्थीच्या मदतीने तिला घरी घेऊन जाण्यासाठी सासऱ्याचे घर चिकलठाणा गाठले.

यावेळी सासरा सूर्यभान रिठे व जावई दत्ता पाटोळे यांच्यात मुलीला त्रास देण्याच्या कारणावरून वाद झाला. यावेळी जावई दत्ता पाटोळे याने शिवीगाळ केल्यामुळे सूर्यभान रिठे यांनी त्यांना घराबाहेर काढून दिले. याचा राग अनावर झाल्याने दत्ता पाटोळे यांनी सासऱ्याच्या पोटात चाकू भोसकून जखमी केले. जावयाने केलेला चाकूचा वार पोटात खोलवर गेल्याने त्यांचा मृत्यू झाला.

 याप्रकरणी योगेश सूर्यभान रिठे याने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी दत्ता रामराव पाटोळे याच्या विरुद्ध सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक गौतम पातारे करीत आहेत.

Web Title: Murder son-in-law stabbed the father-in-law to death

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here