Home Accident News तुळजापूरला दर्शनासाठी जाताना ४ तरुणांचा कार अपघातात मृत्यू

तुळजापूरला दर्शनासाठी जाताना ४ तरुणांचा कार अपघातात मृत्यू

Breaking News | Accident: कार लातूर – नांदेड महामार्गावर महाळंग्रा पाटीनजीक आली असता ती लातूरच्या दिशेने उभ्या असलेल्या उसाच्या ट्रॅक्टरवर आदळली.

4 youths died in a car accident while going to Tuljapur for darshan

चाकूर : नांदेडहून लातूरकडे जाणाऱ्या भरधाव कारने महाळंग्रा पाटीनजीक थांबलेल्या उसाच्या ट्रॅक्टरला पाठीमागून धडक दिल्यामुळे कारमधील चौघा युवकांचा मृत्यू (Death) झाला, तर एकजण गंभीर आहे. हे युवक तुळजापूरला दर्शनासाठी जात होते. रविवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला.

शिवराम लंकाढाई, मोनू कोतवाल, नरमण कतरे, कृष्णा यादव अशी मृतांची नावे आहेत. शुभम लंकाढाई हा तरुण गंभीर जखमी आहे. धडक इतकी भीषण होती की, कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला.

अन्य तिघांना लातूर येथे उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. नांदेड येथील एकूण पाच युवक कारमधून लातूरमार्गे तुळजापूरकडे निघाले होते. कार लातूर – नांदेड महामार्गावर महाळंग्रा पाटीनजीक आली असता ती लातूरच्या दिशेने उभ्या असलेल्या उसाच्या ट्रॅक्टरवर आदळली.

Web Title: 4 youths died in a car accident while going to Tuljapur for darshan

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here