Home अहमदनगर जामखेडमध्ये गोळीबाराचा थरार, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

जामखेडमध्ये गोळीबाराचा थरार, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Breaking News | Ahmednagar: ऊसतोड कामगार मुकादम गंभीर जखमी; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपी पसार.

Thrill of firing in Jamkhed, case registered against two

जामखेड | jamkhed :  जामखेड पोलिस ठाण्यात दीड वर्षापूर्वी जामखेडला पुन्हा गावठी कट्ट्यांचे ग्रहण दाखल केलेल्या गुन्ह्याच्या कारणावरून तालुक्यातील पाटोदा गरडाचे येथे ऊसतोड कामगार मुकादमावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात मुकादम पायाला गोळी लागल्याने जखमी झाला आहे. याप्रकरणी जामखेड पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न व आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पसार झाले असून, त्यांना शोधण्यासाठी पोलिस पथके तैनात करण्यात आली आहेत.

आवेद बाबुलाल पठाण (रा. गरडाचे पाटोदा, ता. जामखेड) असे गोळीबारात जखमी झालेल्या मुकादमाचे नाव आहे. तर, अक्षय उर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे (रा. पाटोदा गरडाचे, ता. जामखेड) व त्याचा साथीदार ( नाव समजले नाही) अशी गोळीबार करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. मुकादम आबेद पठाण यांच्याकडे लक्ष्मण कल्याण काळे (रा. जामखेड) हा ऊसतोड मजूर म्हणून कामाला होता. लक्ष्मण काळे यास आर्थिक कारणावरून दीड वर्षापूर्वी अक्षय मोरे याने मारहाण केली होती. काळे यांनी मोरे याच्या विरोधात दीड वर्षापूर्वी जामखेड पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली होती.

याचाच मनात राग धरून शनिवारी (दि.३) पहाटे एक वाजता अक्षय मोरे याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने गावठी कट्ट्यातून आबेद पठाण यांच्यावर तीन राऊंड फायर केले. यामध्ये एक गोळी आबेद पठाण यांच्या पायाला लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर आरोपी घटनास्थळाहून पसार झाले आहेत. घटनेची माहिती समजताच अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलिस उपअधीक्षक विवेकानंद वाखारे, पोलिस निरीक्षक महेश पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. आरोपीच्या शोधासाठी तीन पथके तैनात करण्यात आली असून, लवकरच आरोपीना पकडण्यात येईल, अशी माहिती अपर पोलिस अधीक्षक खैरे यांनी दिली. अधित तपास सहायक पोलिस निरीक्षक गौतम तायडे हे करत आहेत.

Web Title: Thrill of firing in Jamkhed, case registered against two

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here