Home अहमदनगर Ahmednagar:  त्या बेपत्ता युवकाचा मृतदेह आढळून आल्याने खुनाचा गुन्हा दाखल

Ahmednagar:  त्या बेपत्ता युवकाचा मृतदेह आढळून आल्याने खुनाचा गुन्हा दाखल

Ahmednagar Murder News: बेपत्ता झालेला युवक, मृतदेह नागापूर परिसरातील काकासाहेब म्हस्के रोडवर आढळून आला. दोघांविरूध्द खूनाचा गुन्हा दाखल.

murder was registered after the body of the missing youth was found

अहमदनगर:  बेपत्ता झालेला युवक विजय भगवान कुर्‍हाडे (वय 22 रा. गांधीनगर, बोल्हेगाव) याचा मृतदेह 15 डिसेंबर, 2022 रोजी सकाळी नागापूर परिसरातील काकासाहेब म्हस्के रोडवर आढळून आला होता. त्याचा लाथाबुक्क्यांनी व हत्याराने केलेल्या मारहाणीत मृत्यू झालाचा डॉक्टरांचा प्राथमिक अहवाल एमआयडीसी पोलिसांना प्राप्त झाला आहे. त्यावरून दोघांविरूध्द बुधवार, 28 डिसेंबर, 2022 रोजी रात्री उशिरा खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.

मयत विजय कुर्‍हाडेचा भाऊ गोरख भगवान कुर्‍हाडे (वय 32, मुळ रा. गोंधळे गल्ली, वांबोरी ता. राहुरी, हल्ली रा. गांधीनगर, बोल्हेगाव) यांनी फिर्याद दिली आहे.

दादा ऊर्फ प्रतिक चंद्रकांत कांबळे (रा. नागापूर) व भागेश ऊर्फ गोट्या मधुकर नाकाडे (रा. आदर्शनगर, बोल्हेगाव फाटा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

विजय कुर्‍हाडे हा युवक बेपत्ता झाला होता. त्याच्या नातेवाईकांनी तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. दरम्यान बेपत्ता विजयचा मृतदेह 15 डिसेंबर, 2022 रोजी सकाळी नागापूर परिसरातील काकासाहेब म्हस्के रोडवर आढळून आला होता.

Business Idea | पाच हजार रुपयांच्या गुंतवणुकीत कमवा बक्कळ पैसा | Earn Money from Business

याची माहिती नातेवाईकांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. एमआयडीसी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनसाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केला होता. दरम्यान विजयच्या मृत्यूबाबत नातेवाईकांनी घातपात झाल्याची शक्यता व्यक्त केली होती. पुणे येथील ससून रूग्णालयात त्याचे ‘इन कॅमेरा’ शवविच्छेदन करण्याची मागणी त्यांनी केली होती. पोलिसांनी त्यांची मागणी मान्य करीत विजयच्या मृतदेहाचे शवविच्छेदन पुणे येथील ससून रूग्णालयात केले होते. शवविच्छेदननंतर ‘व्हिसेरा’ राखून ठेवला होता. त्याचा अहवाल अद्याप पोलिसांना मिळालेला नाही.

दरम्यान ससून रूग्णालयाकडून डॉक्टरांचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे. त्यात विजयचा मृत्यू लाथाबुक्क्यांनी व हत्याराने मारहाण केल्याने झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

10 डिसेंबर, 2022 रोजी रात्री नागापूर येथील हॉटेल चैतन्य क्लासिक येथे विजय कुर्‍हाडे व आरोपींमध्ये वाद झाले होते. या वादातून विजयला आरोपींनी लाथाबुक्क्यांनी व हत्याराने मारहाण केली आहे. यावरून आरोपींविरूध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांनी सांगितले.

Web Title: murder was registered after the body of the missing youth was found

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here