Home महाराष्ट्र ‘पप्पू’ म्हणणाऱ्यांना राहुल गांधींचे सणसणीत उत्तर…

‘पप्पू’ म्हणणाऱ्यांना राहुल गांधींचे सणसणीत उत्तर…

Rahul Gandhi: हेच लोक माझ्या आजीलाही ‘मुकी बाहुली’ म्हणायचे….

Rahul Gandhi's celebratory reply to those calling him 'Pappu'

Rahul Gandhi: काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी त्यांना ‘पप्पू’ म्हणून चिडविणाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत. एका मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी, ‘पप्पू’ म्हणणे हा विरोधकांचा प्रोपोगेंडा आहे, त्यामुळे काही फरक पडत नाही असे म्हटले. तसेच, ‘हेच लोक माझ्या आजी इंदिरा गांधींनाही ‘मुकी बाहुली’ म्हणायचे, पण आज त्यांना ‘आयर्न लेडी’ म्हणून ओळखले जाते’, असेही त्यांनी सुनावले.

भारत जोडो यात्रा मुंबईत असताना एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीचा व्हिडिओ राहुल गांधी यांनी मंगळवारी आपल्या युट्यूब चॅनलवर टाकला. व्हिडिओमध्ये, “कोणी ‘पप्पू’ म्हणते तेव्हा वाईट वाटते का?” या प्रश्नावर राहुल म्हणाले, “नाही, ती प्रचार मोहीम आहे. जे बोलताहेत त्यांच्या मनात भीती आहे, त्यांच्या जीवनात काहीच घडत नाहीये. पुढे बोलताना, त्यांनी आपली आजी आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचाही उल्लेख केला. ‘आयर्न लेडी’ म्हणून ओळख बनण्याआधी माझ्या आजीलाही ‘मुकी बाहुली’ म्हटले जायचे, माझ्यावर २४ तास हल्ला करणारे हेच लोक माझ्या आजीला मुकी बाहुली म्हणायचे आणि नंतर मुकी बाहुली अचानक आयर्न लेडी बनली. खरंतर त्या नेहमीच आयर्न लेडी होत्या. तुम्ही मला काहीही म्हणू शकता, मला काही फरक पडत नाही. मला ते मनावर घेण्याची गरज नाही’, असे उत्तर राहुल यांनी दिले. नेटकऱ्यांमध्ये सध्या या व्हिडिओची आणि पप्पू म्हणणाऱ्यांना दिलेल्या उत्तराची चांगलीच चर्चा आहे.

Business Idea | पाच हजार रुपयांच्या गुंतवणुकीत कमवा बक्कळ पैसा | Earn Money from Business

Web Title: Rahul Gandhi’s celebratory reply to those calling him ‘Pappu’

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here